क्रीडा

WCL IND VS PAK: टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन! पाकिस्तान चॅम्पियन्स संघाचा 5 विकेट्सने केला पराभव

वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लीजेंड स्पर्धेच्या फायनलमध्ये इंडिया चॅम्पियन्स संघाने पाकिस्तान चॅम्पियन्स संघाचा 5 विकेटने पराभव करत स्पर्धा जिंकली आहे.

Published by : Dhanshree Shintre

वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लीजेंड स्पर्धेच्या फायनलमध्ये इंडिया चॅम्पियन्स संघाने पाकिस्तान चॅम्पियन्स संघाचा 5 विकेटने पराभव करत स्पर्धा जिंकली आहे. अंबाती रायडू, युसूफ पठाण या विजयाचे शिल्पकार ठरले. या सामन्यात भारतीय चॅम्पियन्सकडून सर्वच खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. अंबाती रायडूने 50 धावांची खेळी केली. त्याने भातचाच्या विजयात मोलाची भुमिका बजावली.

वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स 2024 चे विजेतेपद भारताने पटकावले. बर्मिंगहॅममध्ये पाकिस्तानविरुद्ध झालेला अंतिम सामना युवराज सिंगच्या नेतृत्वाखाली इंडिया चॅम्पियन्सने सहज जिंकला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघ 156 धावा करू शकला आणि प्रत्युत्तरात भारतीय चॅम्पियन्सने 5 चेंडूत 5 गडी गमावून सहज लक्ष्य गाठले.

या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार युनूस खानने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान चॅम्पियन्सने 156 धावा केल्या. सलामीवीर शरजील खानला आज मोठी खेळी करता आली नाही आणि तो 12 धावा करून बाद झाला. यानंतर कामरान अकमल आणि सोहेब मकसूद यांनी पाकिस्तानचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. कामरानने 24 धावा केल्या मात्र तो पवन नेगीच्या गोलंदाजीवर बाद झाला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींसाठी चांगला जाईल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या