IPL 2022: आज आयपीएलमध्ये (IPL) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore ) आणि पंजाब किंग्जशी (Punjab Kings) यांच्यात सामना होणार आहे. यंदाच्या आयपीएलमधील हा तिसरा सामना असणार आहे. दरम्यान, बंगळूरूचे 2 दिग्गज खेळाडू आजच्या सामन्याच मैदानाबाहेर राहणार असल्याने बंगळूरूची चिंता वाढली आहे.
आरसीबीला पहिल्या काही सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेल आणि जोश हेझलवूडची उणीव भासणार आहे. मॅक्सवेल लग्नासाठी बाहेर आहे तर हेजलवूड पाकिस्तान दौऱ्यावर असलेल्या ऑस्ट्रेलियन संघात आहे. आजचा हा सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरु होणार आहे.
RCB मध्ये डु प्लेसिस:
गेल्या महिन्यात झालेल्या मेगा लिलावात दक्षिण आफ्रिकेच्या डु प्लेसिसला (Faf Du Plessis) आरसीबीने 7 कोटी रुपयांना विकत घेतले होते. 37 वर्षीय डु प्लेसिस आणखी काही वर्षे खेळू शकणार आहे. त्याच्या कामगिरीकडे देखील सर्वांचे लक्ष असणार आहे.