महेश महाले, नाशिक
थोडक्यात
कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत
आजपासून बांगलादेशकडून कांदा आयातीवर 10 टक्के शुल्क आकारणी
भारतातून बांगलादेशमध्ये निर्यात होणाऱ्या कांद्यावर बांगलादेशकडून 10 टक्के आयात शुल्क लागू
कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत येणार आहेत. आजपासून बांगलादेशकडून कांदा आयातीवर 10 टक्के शुल्क आकारणी करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
भारतातून बांगलादेशमध्ये निर्यात होणाऱ्या कांद्यावर बांगलादेशकडून 10 टक्के आयात शुल्क लागू करण्यात येणार आहे.
भारतातील विशेषतः राज्यातील कांद्याची सर्वाधिक निर्यात बांगलादेशमध्ये होते. आजपासून बांगलादेशकडून कांद्यावर आयात शुल्क लागू करण्यात आले असून त्यामुळे आता कांद्याच्या भावावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.