Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar : Sanjay Shirsat : शिवसेना मंत्री संजय शिरसाटांच्या निवास्थानाबाहेर दारू पिऊन तरूणाचा धिंगाणा; गुन्हा दाखल

शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांच्या निवासस्थानासमोर रविवारी रात्री उशिरा एका तरुणाने दारूच्या नशेत धिंगाणा घातल्याची घटना समोर आली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

(Chhatrapati Sambhajinagar) शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांच्या निवासस्थानासमोर रविवारी रात्री उशिरा एका तरुणाने दारूच्या नशेत धिंगाणा घातल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये मंत्री शिरसाट यांची वाहने आणि सुरक्षा यंत्रणाही लक्ष्य बनली. अगदी पालकमंत्र्यांच्या गाड्यांच्या मागे धावत असल्याची माहिती देखील समोर आली. संबंधित तरुणाच्या विरोधात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सौरभ भोले असे या धिंगाणा घालणाऱ्या तरुणाचे नाव असून तो प्रचंड नशेत असताना मंत्री संजय शिरसाट यांना भेटायचे आहे, असे म्हणत आरडाओरड करत होता. त्याने मंत्री निवासाच्या परिसरात गोंधळ घालत गाड्यांच्या मागे धाव घेतली तसेच सुरक्षा रक्षकांना शिवीगाळ करत धमक्याही दिल्या.

घटनेदरम्यान परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुरक्षारक्षकांनी या तरुणाला थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्याने अरेरावीची भाषा वापरली. काही वेळाने परिस्थिती नियंत्रणात आली आणि पोलिसांना बोलावण्यात आले.छत्रपती संभाजीनगरमधील सातारा पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत संबंधित तरुणाला ताब्यात घेतले आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केला.

दारू पिऊन सार्वजनिक शांतता भंग केल्याचा आणि शासकीय व्यक्तींच्या सुरक्षेला बाधा निर्माण केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकारामुळे मंत्री शिरसाट यांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून व्हीआयपी सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींबाबत पोलीस आणि प्रशासनाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास छत्रपती संभाजीनगर येथील सातारा पोलीस करीत आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com