व्हिडिओ

Bhiwandi: भिवंडीतील व्यावसायिकाने गुंतवणूकदारांची केली 175 कोटींची फसवणूक

भिवंडीत स्वस्तात घर देण्याचे आमिष दाखवून बिल्डरने गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे.

Published by : Team Lokshahi

भिवंडीत स्वस्तात घर देण्याचे आमिष दाखवून बिल्डरने गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये बिल्डर महावीर पटवाने नागरिकांची तब्बल 175 कोटींची फसवणूक केली आहे. स्वस्तात घराच्या जाहिरातींला भुलून सुमारे 4 हजारांहून अधिक नागरिकांनी या प्रकल्पात पैसे गुंतवले होते मात्र बिल्डरने हा प्रकल्प अर्धवट सोडून गुंतवणूकदारांचे सुमारे 175 कोटी रुपये हडप केले आहे. याबाबत बिल्डरविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली होती. यानंतर गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे व राज्य शासनाकडे देखील तक्रार दाखल केली होती. यासंदर्भात राज्याच्या गृह विभागाने 10 नोव्हेंबर 2023 रोजी महावीर पटवा बांधकाम व्यवसायिकाची मालमत्ता सील करण्याचे आदेश दिले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद