व्हिडिओ

Nashik | Amit Thackeray यांच्याकडून कार्यकर्त्यांचे कौतुक

Published by : Team Lokshahi

नाशिक: मनसे नेते अमित ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत, जामीन मिळाल्यानंतर तोडफोड करणाऱ्या नाशिकमधील मनसे कार्यकर्त्यांचा अमित ठाकरे स्वतः सत्कार केला आहे. मी कार्यकर्त्यांचं अभिनंदन करायला आलो आहे, असे अमित ठाकरे म्हणाले आहेत.

अमित ठाकरे गाडी टोलनाक्यावर अडवल्याप्रकरणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी टोलनाक्याची तोडफोड केली. हा टोलनाका फोडणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. परंतु, त्यांना आता जामीन मिळाला आहे. या कार्यकर्त्यांना जामीन मिळताच अमित ठाकरे यांनी नाशिकला जाऊन त्यांची भेट घेतली आणि अभिनंदन केले. हा फक्त ट्रेलर, वेळ आली तर पिक्चर दाखवू, असा इशाराही अमित ठाकरेंनी दिला आहे.

'एकदा राज साहेबांवर विश्वास ठेवा, संधी द्या' अशी विनंती अमित ठाकरेंनी केली आहे. तसेच 'भाजपच्या टीकेला मी भीक घालत नाही', असे वक्तव्य देखील त्यांनी केले आहे.

"२० तारखेला निवडणूक होऊद्या, २१ तारखेला मिटिंग लावतो आणि..."; नाशिकच्या सभेत उपमुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

Carrom: कॅरम खेळल्याने होतात हे शारीरिक फायदे! जाणून घ्या...

Chess: बुद्धिबळ खेळण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या...

भारताचा स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्रीनं केली निवृत्तीची घोषणा; BCCI ने शेअर केली 'ही' खास पोस्ट

Rubik's Cube: तुम्हाला रुबिक्स क्यूब खेळायची सवय आहे का? तर मग हे वाचाच...