संगमनेरच्या संकल्प मेळाव्यात भाजप नेते वसंतराव देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केलं. यानंतर संगमनेरमधील वातावरण तापले आहे. या घटनेनंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं, मात्र त्यांच्यावरच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संतप्त कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या करत विरोध दर्शवला होता. त्यावरुनच आज डॉ. जयश्री थोरात यांच्यावर जमावबंदीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.