दादरच्या 80 वर्षे जुनं हनुमानाचं मंदिर पाडण्यासाठी रेल्वेने नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे. या मुद्द्यावरुन ठाकरे गटाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. त्यांना प्रत्युत्तर देत असताना किरीट सोमैया म्हणाले की,
मी एवढचं सांगणार की, जे आपल्या वडिलांचे होऊ शकले नाही आणि बोट झिहादच्या आहारी जाऊन लोकसभेत काही जागा अधिक मिळवल्या परंतू विधानसभेत वोट झिहादच्या विरोधात धर्म युद्ध विजयी झाला आणि आता अक्कस ठिकाण्यावर आली आहे. पुन्हा हिंदूत्त्वावर कोणी जर आपली भक्ती व्यक्त करत असेल तर देव त्यांना सदबुद्धी देवो असं म्हणत किरीट सोमैयांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.