व्हिडिओ

Uddhav Thackeray on Modi : 'मोदी व्हॅक्यूम क्लीनरसारखे फिरतायत', ठाकरेंची पंतप्रधान मोदींवर टीका

Published by : Dhanshree Shintre

भाजपचा व्हॅक्यूम क्लीनर झाला आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. मोदी व्हॅक्यूम क्लीनरसारखे इकडे-तिकडे फिरत आहेत असं उद्धव ठाकरे म्हणत आहेत. निवडणूक रोखे घोट्याळामुळे भाजपचा बिंग फुटलं आहे. निवडणुक रोखे मोठा घोटाळा असल्याचं उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे.

उद्धव ठाकरे मोंदीवर टीका करत म्हणाले की, माजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे यजमान त्या मोदी सरकारमध्ये अर्थमंत्री होत्या. कदाचित त्यांच्या काळामध्ये ही योजना आणली गेली असेल. जगातला सर्वाच मोठा घोटाळा ज्याचा सुप्रीम कोर्टामध्ये पर्दाफाश झाला नसता तर यांना हजारो कोटी रुपये कोणी आणि कसे दिले हे कळलं नसतं आणि चंदा दो और धंदा लो हे काम यापुढे सुद्धा चालू राहिलं असतं ते या निमित्ताने आता याची सत्ता येत नाही आणि हे सगळं आता उघड झालं. त्याच्यामुळे विरोधी पक्षाला पश्चाताप जरुर होईल. हे आधी का नाही लक्षात आलं. व्हॅक्यूम क्लीनर जसा असतो धूळ गोळा करणारा तसा भाजप आता व्हॅक्यूम क्लीनर झाला आहे. भ्रष्टाचारी गोळा करत आहेत. कुठे कुठे भ्रष्टाचारी आहे, कुठल्या फटीत आहे का ते सगळं मोदींचं व्हॅक्यूम क्लीनर फिरतंय आणि सगळी भ्रष्टाचारी भाजपात आहे.

Sanjay Raut : फक्त आमची सभा होऊ नये म्हणून प्रधानमंत्र्यांना बोलवण्यात आलं

Sanjay Raut : प्रधानमंत्री मुंबईत येऊन 25 - 30 सभा घेतात, मग तुम्ही 10 वर्ष काहीच काम केलं नाही ना

पंतप्रधान मोदी यांच्या सभेत घोषणा देणाऱ्या तरुणाने घेतली शरद पवार यांची भेट

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र; म्हणाले...

शिरूर मतदारसंघाच्या ईव्हीएम स्ट्राँगरुममधील सीसीटीव्ही 24 तास बंद