काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी जाहीर सभेत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी दाखल याचिकेत जामीन मिळवण्यासाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना उपस्थित रहावचं लागणारे. जिल्हा आणि सत्र न्यायालयानं त्यांना उपस्थित राहण्याचे आदेश दिलेत.