बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत. अनेक ठिकाणी या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. साताऱ्यातील विविध पक्षांनी एकत्र येऊन, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना शिक्षा द्यावी, या मागणीसाठी साताऱ्यातील पोवई नाका, शिवतीर्थावर आज शनिवारी 8 मार्च रोजी मोर्चा काढला.
मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग होता. संतोष देशमुख यांच्या हत्येत जे सामील आहे त्यांचा तपास करून सर्वांना शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनमध्ये सकल मराठा समाज, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, काँग्रेस, भाजप व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते सामील झाले होते.