ताज्या बातम्या
Sandeep Deshpande : 'आवाज मराठीचा!', विजयी मेळाव्यासाठी संदीप देशपांडेंचा खास टी-शर्ट; मराठीची मुळाक्षरेही दिसताहेत उठून
मराठी भाषेच्या अस्मितेसाठी लढा हातात घेतलेल्या मनसेच्या नेत्यांनी हिंदी भाषा सक्तीविरोधातील मोहिमदेखील प्रतिष्ठेची मानत लढली.
मुंबईत होणाऱ्या विजयी मेळाव्यासाठी राज्यभरातून मनसैनिक आणि शिवसैनिक वरळी येथी डोम सभागृहाच्या दिशेने रवाना होत असतानाच या कार्यकर्त्यामधील उत्साह शिगेला पोहोचला आहे. मराठी भाषेच्या अस्मितेसाठी लढा हातात घेतलेल्या मनसेच्या नेत्यांनी हिंदी भाषा सक्तीविरोधातील मोहिमदेखील प्रतिष्ठेची मानत लढली. त्यातच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आजच्या खास दिवसासाठी खास बनावटीचा टी-शर्ट परिधान केला असून यावर आवाज मराठीचा, असे लिहिले आहे. तसेच मराठीतील बाराखडीची अक्षरंदेखील टी-शर्टवर उमटलेली दिसत आहेत. संदीप देशपांडे यांनी मराठी विरूद्ध इतर भाषिक या लढ्यात नेहमीच ठाम भूमिका घेतली आहे. त्यामुळे हिंदी सक्तीविरोधातील जीआर सरकारने मागे घेणं हा सर्व मराठी भाषिकांचा विजय असून त्यासाठी देशपांडेंनी अशा पद्धतीने आनंद व्यक्त केला आहे.