पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केलेल्या टीकेवर शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'पंतप्रधान मोदींनी माझ्यावर केलेली टीका नवी नाही' असे शरद पवार यावेळी म्हणाले. सोबतच अमित शहांनी (Amit Shah) माझ्यावर टीका केली, त्यावेळी त्यांचा उमेदवार पडला असेही प्रत्युत्तर शरद पवारांनी दिले आहे. शरद पवार आज सोलापूर येथे बोलत होते.