महानगरपालिका शाळेत चक्क दोन शिक्षिकांनी आपल्या जागेवर परस्पर केली भाडोत्री महिला शिक्षिकांची नियुक्ती केली. महिन्याला लाखभर पगार घेणाऱ्या महापालिकेतील शिक्षिकांनी आपल्या जागेवर कमी पगारात महिलांची नियुक्ती केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. न्यायालयीन समितीच्या पाहणीत जुना बाजार आणि समतानगर येथील शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. समता नगर महानगरपालिका शाळेतील माजी नगरसेवकाची पत्नी शिक्षिका असून इतर शिक्षिकेची नियुक्ती केली होती. शिक्षकांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.