मुलीचा पाठलाग करून तिला शिवीगाळ, धक्काबुक्की करणे हे तिच्यासाठी चिड आणणारे ठरू शकते. परंतु, हा एखाद्या महिलेचा विनयभंग आहे, हे म्हणता येणार नाही, असे मत व्यक्त करीत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका विनयभंगाच्या प्रकरणातील दोषीला दिलासा देत त्याची शिक्षेतून मुक्तता केली आहे.