मुंबई: शिवप्रतिष्ठानकडून हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य पदयात्रा काढण्यात आली. यामध्ये भगवा ध्वज आणि भारतमातेचं पोस्टर घेऊन रॅली काढण्यात आली. या प्रकरणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
स्वातंत्र्यादिनीच संभाजी भिडेंनी भगवा ध्वज आणि भारतमातेचं पोस्टर घेऊन रॅली कशी काय काढत आहेत? असा सवाल विजय वडेट्टीवारांनी केला आहे. तसेच या संभाजी भिडेंच्या शिवप्रतिष्ठानकडून काढण्यात आलेल्या पदयात्रेवर वडेट्टीवारांनी सडकून टीका केली आहे.