एकनाथ शिंदे-फडणवीसांमध्ये पाऊण तास बैठक संपन्न झाली. एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात राहणार की जाणार? हा प्रश्न उपस्थित झाला होता. मंत्रिमंडळ सहभागाबाबत शिंदे-फडणवीसांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. गृहखातं आपल्याकडेच ठेवण्यावर भाजप ठाम असल्याची माहिती मिळतेय. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एकनाथ शिंदे गृह खात्यासाठी आग्रही असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपपुढे मोठी अट ठेवली असल्याचं कळतंय. एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी सकारात्मक असल्याचं कळतंय. सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदेंसोबत फडणवीसांची 'वर्षा'वर चर्चा झाली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.