Mumbai

वरळी विधानसभेत आदित्य ठाकरे विरुद्ध शायना एनसी? भाजपच्या शायना एन सी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवण्याची शक्यता

निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे.

Published by : Siddhi Naringrekar

निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत आहेत. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या.

20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. यातच आता वरळी विधानसभा मतदारसंघातून मोठी बातमी समोर येत आहे. भाजपच्या शायना एन सी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळत आहे.

वरळी विधानसभेत आदित्य ठाकरे विरुद्ध शायना एनसी असा सामना पाहायला मिळणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. वरळी विधानसभा मतदारसंघात मशाल विरुद्ध धनुष्यबाण अशीच लढत करण्याची महायुतीची रणनीती असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे् आता ही निवडणूक कोण जिंकणार? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वे वाहतूक बंद

Latest Marathi News Update live : पुण्यात अमली पदार्थांचा सुळसुळाट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस चांगला जाईल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार