ब्रम्हपुरी मतदारसंघ
उमेदवाराचं नाव - विजय वडेट्टीवार
मतदारसंघ - ब्रम्हपुरी (जिल्हा चंद्रपूर)
उमेदवाराची माहिती - (विभाग) - विदर्भ
पक्षाचं नाव - काँग्रेस
समोर कोणाचं आव्हान : प्रतिस्पर्धी उमेदवार अजून ठरलेला नाही
उमेदवाराची कितवी लढत - 5
2019 मधील आकडेवारी -- 82002 ( विजयी)
मतदारसंघातील आव्हानं
ओबीसीबहुल मतदारसंघ असून, वडेट्टीवार हे अल्पसंख्यांक आहेत. मागील दोन्ही निवडणुकीत प्रतिस्पर्धी भाजपने सुद्धा अल्पसंख्यांक उमेदवार दिल्याने वडेट्टीवार यांना विजय सोपा झाला. आता यावेळी वडेट्टीवार यांनी ओबीसी नेता म्हणून प्रतिमा निर्माण केल्याने त्याचा फायदा त्यांना मिळू शकतो. तर विरोधकही ओबीसी कार्ड खेळण्याची शक्यता. सध्या संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात इतर आव्हानांपेक्षा जातीय समीकरणांनाच अधिक महत्व आले आहे.
उमेदवाराचे प्लस पॉईंट्स
बऱ्यापैकी विकासात्मक अनेक कामे मतदारसंघात झाली. दलीत मते आकर्षित करण्यासाठी भव्य विपश्यना केंद्र, विरोधात असूनही निधी आणला. काँग्रेसचा आक्रमक वक्ता म्हणून जिल्ह्यात मान्यता. विरोधी पक्षनेता. राज्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक.