(Rain Update ) राज्यभरात पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने विविध जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा दिला आहे. काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. यातच आता पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे.
कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत असून राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे. आज कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसाच्या जोरदार सरींची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
यासोबतच मराठवाडा आणि विदर्भात देखील यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर कमी झाला असला, तरी तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडत आहे.
ऑरेंज अलर्ट
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा
यलो अलर्ट
पालघर, ठाणे, मुंबई, नाशिक घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली