Weather Update 
Weather Update

Weather Update : येत्या 3 तासात 'या' भागात मुसळधार पावसाचा अंदाज

मंगळवारपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

पुढील काही तास मुंबई, ठाणे, रायगडमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज

काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता

मंगळवारपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज

Weather Update ) काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. राज्यात पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने विविध जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा दिला आहे. यातच आता पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे.

महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आजपासून मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील काही तास मुंबई, ठाणे, रायगडमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे.

40 ते 50 प्रतितास वेगाने वारे वाहतील तर गडगडाटासह पाऊस पडेल असा अंदाज असून मंगळवारपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. राज्यात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस माघारी घेण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Income Tax Return Filing : ITR भरण्याचा आज शेवटचा दिवस; अंतिम तारीख चुकल्यास...

Latest Marathi News Update live : आचार्य देवव्रत यांचा शपथविधी सोहळा

Pune : पुण्यात मुसळधार पाऊस; थेऊरमधील 50 घरामध्ये शिरलं पाणी

Mumbai Monorail : मुंबईतील मोनोरेल पुन्हा ठप्प; महिन्याभरात तिसऱ्यांदा बिघाड