(Raigad Rain Update ) राज्यभरात पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने विविध जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा दिला आहे. काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. आता पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे.
ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत असून राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे. आज कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यातच रायगड जिल्ह्याला आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगडच्या अनेक तालुक्यात शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
पावसाचा जोर वाढल्याने प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. अलिबाग, रोहा, तळा, महाड,पोलादपूर या पाच तालुक्यातील शाळा, महाविद्यालये आज बंद राहणार आहे.