थोडक्यात
राज्यात पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाचा विविध जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा
पुढील 2 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा
महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळेल,असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला
(Weather Update) काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. राज्यात पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने विविध जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा दिला आहे. यातच आता पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे.
महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यात ढगाळ वातावरण कायम असलेले पाहायला मिळत असून पुढील 2 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला असून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई, पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
यासोबतच विदर्भात काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, सांगली, जळगाव, नंदूरबार जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी बरसणार असल्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचे सांगण्यात आले आहे.