संस्कृती बालगुडेचं घायाळ करणारा लूक

Siddhi Naringrekar

अभिनेत्री संस्कृती बालगुडे वेगवेगळ्या शूट्स मध्ये हटके लुक्स ट्राय करत असते.

चित्रपट, मालिका या दोन्ही क्षेत्रांमध्ये वावरणारा तरुण चेहरा म्हणजे संस्कृती बालगुडे.

संस्कृती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. तिचे अनेक व्हिडीओ, फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करत असते

लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड.

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयामधून तिनं भरत नाट्यमच्या परीक्षा दिल्या आहेत.

ती नृत्यात पारंगत असून तिच्या नृत्याचे अनेक शो भारतात आणि भारताबाहेर झाले आहेत.

तिची पिंजरा ही मालिका चांगलीच गाजली होती.

‘शॉर्टकट’, ‘शिनमा’, ‘सांगतो ऐका’, ‘माकडाचं लगीन’, ‘भाय’, ‘एफयु-फ्रेंडशिप अनलिमिटेड’, ‘लग्न मुबारक’, ‘रे राया’ हे तिचे काही महत्त्वाचे चित्रपट.

नुकतंच तिने एक नवं फोटोशूट शेअर केलं आहे, ज्यात ती कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे.

यात संस्कृती पांढरा शर्ट आणि जीन्स घातलेली दिसत आहे.