तेजस्वी प्रकाशचा करण कुंद्रासोबत ब्रेकअप? अभिनेत्रीने स्पष्ट सांगितले

Shweta Shigvan-Kavankar

टेलिव्हिजन अभिनेता करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांची जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

करण कुंद्राच्या ट्विटनंतर त्यांच्या ब्रेकअपची चर्चा सुरू झाली आहे.

नुकतेच करण कुंद्राने ट्विट करून लिहिले की, 'ना तुझी शान कमी झाली असती. ना तुझा रुतबा कमी झाला असता. जे घमंडमध्ये सांगितले ते हसतमुखाने सांगितले असते.

ब्रेकअपच्या बातमीवर मौन तोडत तेजस्वी प्रकाशने आपल्या नात्याची सत्यता सांगितली आहे.

एका मुलाखतीत तेजस्वीने ब्रेकअपची बातमी खोटी असल्याचे सांगितले आहे.

तेजस्वी प्रकाश म्हणाली की, प्रेमाबद्दल मी अंधश्रध्दाळू आहे. मला वाटते की यावर अधिक बोलले तर नात्याला नजर लागू शकते.

लग्न माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे, वेळ आल्यावर त्यावर बोलेल, असे तिने सांगितले.

करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांची बिग बॉस 15 मध्ये भेट झाली होती. यातच त्यांची मैत्री झाली आणि नंतर त्याचे रुपांतर प्रेमात झाले.

बिग बॉसच्या घरातून बाहेर काढल्यानंतर करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांनी त्यांचे नाते अधिकृत केले.