डोळ्यात काजळ, केसात गजरा! जान्हवीला पाहून चाहत्यांना झाली स्मिता पाटीलची आठवण

Shweta Shigvan-Kavankar

जान्हवी कपूर ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

जान्हवी सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव्ह असून फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांसोबत कनेक्ट असते.

नुकतेच तिने इंस्टाग्रामवर नवीन फोटोशूट शेअर केले आहे.

या फोटोत जान्हवी कपूरने फ्लोरल प्रिंटेड साडी घातली आहे आणि गळ्यात चोकर घालून लूक पूर्ण केला आहे.

तर, डोळ्यात काजळ आणि केसात गजरा घातला असून जान्हवी खूपच सुंदर दिसत आहे.

जान्हवीचे हे ब्लॅक अँड व्हाइट फोटो पाहून चाहत्यांना स्मिता पाटीलची आठवण झाली.

चाहते आणि सेलिब्रिटीही जान्हवीच्या फोटोंचं कौतुक करत आहेत.

एका युजरने लिहिलं की, दिग्गज अभिनेत्री स्मिता पाटीलसारखी दिसते. दुसऱ्याने लिहिले, स्मिता पाटीलसारखे चित्र.

एकाने 'स्मिता पाटील यांच्या बायोपिकमध्ये काम करावं' असा सल्ला दिला आहे.

जान्हवी कपूर लवकरच 'NTR 30'मधून साऊथ इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे.