shamal ghanekar
कोकममध्ये व्हिटॅमीन सी हे जीवनसत्वे जास्त प्रमाणात आढळते. जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. तसेच मॅगनीज, पोटॅशीअम ही खनिजे ही अढळतात.
तुम्ही नेहमीच्या आहारामध्ये कोकमचा वापर केल्याने तुम्हाला जाणवणाऱ्या आम्लपित्त, भूक मंद होणे, अपचन अशा अनेक समस्या दूर होण्यासाठी मदत होते.
तुम्ही कोकम पाण्यामध्ये टाकून त्याचे सेवन केल्याने तुम्हाला जाणवणारी अपचनाची समस्या दूर होण्यासाठी मदत होते.
अंगावर सारखे पित्त उठत असेल तर तुम्ही कोकमचा कल्क संपूर्ण अंगाला लावल्याने तुम्हाला आराम मिळेल. त्यामुळे कोकम आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.
उष्णतेमुळे हातापायांची आग होत असल्याने तुम्ही संपूर्ण अंगाला कोकमचे तेलही चोळू शकता ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
आपल्या आहारात कोकमचा समावेश केल्याने हृदयाससंबंधीत समस्या दूर ठेवण्यासाठी ते खूप फायदेशीर असते. रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठीही मदत करते.
तुम्हाला जर फळ खायला आवडत नसेल तर तुम्ही त्याचे ज्यूस तयार करून त्याचे सेवन करू शकता. ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.