प्राजक्ता माळीचे लवकरच होणार शुभमंगल? दिली हिंट

Shweta Shigvan-Kavankar

प्राजक्ता माळी एक बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

ती सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते.

प्राजक्ताची एक पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये अभिनेत्रीने एक व्हिडीओ शेअर केला आहे.

त्यात फक्त एका मुलीचे पाय आणि पैंजण दिसत आहेत.

हा व्हिडीओ शेअर करत प्राजक्ताने 'हिंट' असं कॅप्शन दिलं आहे.

यावरून अनेकांना प्राजक्ता साखरपुडा किंवा लग्न करतेय का? असा प्रश्न पडला आहे.

परंतु, पुढे प्राजक्ताने नक्कीच साखरपुडा अथवा लग्न नाही…त्यासाठी वाट बघा, असेही कॅप्शनमध्ये लिहीले आहे.

प्राजक्ताने उद्या लाईव्हच्या माध्यमातून 5.30 वाजता याबाबत माहिती देणार असल्याचेही सांगितले आहे.

प्राजक्ताच्या या पोस्टने सगळ्यांचीच उत्कंठा वाढली आहे.