रश्मिका मंदानाचा ब्लॅक ड्रेसमध्ये बोल्ड अंदाज; चाहते मात्र भडकले

Shweta Shigvan-Kavankar

अभिनेत्री रश्मिका मंदाना साऊथसोबतच बॉलिवूडमध्ये लोकप्रिय अभिनेत्री आहे.

तिच्या क्युटनेसवर चाहते नेहमीच फिदा होतात.

रश्मिका सोशल मीडियाद्वारे फोटो, व्हिडीओ शेअर करत चाहत्यांशी कनेक्ट असते.

रश्मिकाने नुकतेच एका अवॉर्ड शोमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

यामध्ये रश्मिकाने काळ्या रंगाचा बॉडीकॉन शॉर्ट ड्रेस घातला होता. सोबत लांब ट्रेल होता. तर, एका बाजूला फुललेली स्लीव्ह होती.

यासह तिने केसांचा बन घातला असून लाईट मेकअप केला होता.

या बोल्ड लूकमध्ये रश्मिका खूपच सुंदर दिसत होती.

परंतु, हा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला नसून तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहेत.

युजर म्हणला की तिलाही बॉलिवूड अभिनेत्रीप्रमाणे रंग चढला आहे. तर, दुसऱ्याने उर्फी जावेदसारखी बनू नकोस, असे सुनावले आहे.

रश्मिका नुकतीच अमिताभ बच्चन यांच्यासोबत गुडबाय चित्रपटात दिसली होती. लवकरच ती अनेक हिंदी प्रकल्पांमध्ये दिसणार आहे.