लग्नात भारतीय लूक कॉपी केल्याने पाक अभिनेत्रीला फटकारले; ट्रोलर्स म्हणाले, संस्कृती विसरली

Shweta Shigvan-Kavankar

पाकिस्तानची सर्वात प्रसिद्ध आणि सुंदर अभिनेत्री उष्ना शाह मिसमधून मिसेस बनली आहे.

उष्नाने गोल्फपटू हमजा अमीनसोबत लग्नगाठ बांधली आहे.

उष्णाच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

तिने लग्नात लाल रंगाचा हेवी एम्ब्रॉयडरी घागरा घातला होता. यावेळी उष्णाचा लूक पाहण्यासारखा होता.

उष्णाने तिच्या वधूच्या लुकला मांग पट्टी आणि हेवी दागिन्यांसह पूर्ण केला होता.

लग्नात उष्नाने आपल्या पतीसोबत जोरदार डान्स केला. यामुळे अनेक जण तिला ट्रोल करत आहेत.

उष्णाने लग्नात लाल रंगाचा लेहेंगा परिधान केल्यामुळे अनेक युजर्स तिच्यावर टीका करत आहेत.

एका यूजरने लिहिले की, पाकिस्तानी लोकांचा स्वतःचा धर्म आणि संस्कृती आहे. भारतीय संस्कृतीची कॉपी करणे थांबवा.

तर, दुसऱ्या युजरने म्हंटले, पाकिस्तानी नववधूंनी भारतीय शैलीत कपडे का घालायला सुरुवात केली आहे. ही आपली संस्कृती नाही.

ट्रोल केल्यानंतर उष्ना शाहने ट्रोलर्सला फटकारले आहे. तुम्हा लोकांना लग्नासाठी आमंत्रित केले नव्हते. तुम्ही माझ्या लग्नाच्या ड्रेसवर आणि दागिन्यांवर पैसे खर्च केले नाहीत, असे प्रत्युत्तर तिने दिले आहे.