​रिअॅलिटी शोचा बादशाह प्रिन्स नरुलाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

Team Lokshahi

अष्टपैलू कलाकार म्हणून ओळखला जाणारा प्रिन्स नरुलावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव.

यशस्वी मॉडेल, उत्तम डान्सर, अभिनेता, उत्तम धावपटू, डॅशिंग व्यक्तिमत्वसाठी प्रिन्स नरुला ओळखला जातो.

अनेक रिअॅलिटी शो मधून त्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

त्याला 'रिअॅलिटी शोचा राजा' म्हणून संबोधले जाते.

स्प्लिट्सविला 8 मध्ये कनेक्शन बनवण्याची कौशल्ये, बिग बॉस 9 मध्ये बिनधास्त वृत्ती, नच बलिये 9 मधील असाधारण डान्स मूव्ह, रोडीज सीझन 18 मधील नेतृत्व करण्याचे कौशल्य असे अनेक कलागुण त्याच्यामध्ये आहेत.

प्रिन्स आणि त्याची पत्नी युवीका यांची केमेस्ट्री प्रेक्षकांना फारच भावते आहे, ते दोघ त्यांच्यातील प्रेमामुळे नेहमीच चर्चेत असतात.

प्रिन्स आणि युविकाच्या जोडगोळीला चाहत्यांनी 'प्रविका' असे नाव दिले आहे.

प्रिन्स आणि युविका दिवसेंदिवस आपले रोमॅंटिक फोटोज आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना खुश करत असतात.