Drishyam 2
Drishyam 2Team Lokshahi

Drishyam 2 Box Office Collection : दृश्यम 2 ची कमाई ठरणार मैलाचा दगड; रिलीजच्याच दिवशी 15.38 कोटींचा टप्पा गाठला!

अजय देवगणचा दृश्यम 2 म्हणजे ''शब्दो पे नही दृश्यो पे ध्यान दो...'' असाच दृश्यांवर खेळवून ठेवणारा चित्रपट आहे.
Published by :
Pankaj Prabhakar Rane

अजय देवगणचा दृश्यम 2 म्हणजे ''शब्दो पे नही दृश्यो पे ध्यान दो...'' असाच दृश्यांवर खेळवून ठेवणारा चित्रपट आहे. एकापेक्षा एक ट्विस्ट, जबरदस्त क्लायमॅक्स, सीन्सचा थरार, सस्पेन्स या जोरावर या चित्रपटाने लक्ष वेधून घेतलय.

Drishyam 2
Drishyam 2 Review : शेवटपर्यंत खेळवून ठेवणारा सस्पेन्स आणि जबरदस्त क्लायमॅक्स

हा चित्रपट 18 नोव्हेंबरला सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. दृश्यम 2 ने पहिल्या शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर 15.38 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाने समीक्षकांची प्रशंसा आणि कौतुक मिळवले आहेत. चित्रपटगृहांमधील गर्दी इतकी वाढली आहे की दृश्यम 2 ची मागणी पूर्ण करण्यासाठी मल्टिप्लेक्समध्ये मध्यरात्रीचे शो जोडले आहेत. चित्रपट आठवड्याच्या शेवटी वाढेल आणि वीकेंडला चांगला क्रमांक मिळवेल अशी अपेक्षा आहे.

'दृश्यम 2' हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता होती. 2 आणि 3 ऑक्टोबरला काय झालंय माहिती आहे ना? विजय साळगांवकर पुन्हा येतोय त्याच्या कुटुंबासोबत,असं म्हणत या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण केली जात होती.

या दोन दिवसांत नक्की काय झालं होतं, याचं उत्तर आता 'दृश्यम 2' मध्ये प्रेक्षकांना मिळलं आहे. या चित्रपटात अजय देवगण व्यतिरिक्त श्रिया सरन, तब्बू, इशिता दत्ता, रजत कपूर आणि मृणाल जाधव हे कलाकार दिसले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com