‘आई कुठे काय करते’ मधील गौरीने हटके पद्धतीने नेसली साडी; पाहा फोटो

Siddhi Naringrekar

अभिनेत्री गौरी कुलकर्णी ‘आई कुठे काय करते’ मालिकेतून प्रसिद्धीझोतात आली.

या मालिकेत यशच्या प्रेयसीची गौरीची भूमिका साकारून ती घराघरात पोहोचली.

गौरी सोशल मीडियावरही सक्रिय असते. नुकतंच तिने साडी नेसून फोटोशूट केलं आहे.

फोटोमध्ये तिने हिरव्या रंगाची साडी नेसून त्यावर जांभळ्या रंगाचा स्लिव्हलेस ब्लाऊज परिधान केला आहे.

विशेष म्हणजे गौरीने फोटोशूटसाठी कोदावथी पद्धतीने साडी नेसली आहे.

कर्नाटक राज्यात स्त्रिया अशा पद्धतीने साडी नेसतात.

साजेसा मेकअप, केसांत गजरा माळून गौरीने पारंपारिक लूक केला आहे.गौरीचं हे हटके फोटोशूट चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

फोटोवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.