'मन उडू उडू झालं' फेम ह्रता दुर्गुळे अडकली लग्नबंधनात...

shamal ghanekar

'मन उडू उडू झालं' फेम ह्रता दुर्गुळे (Hruta Durgule) आणि दिग्दर्शक प्रतीक शाह (Prateek Shah) यांचा काल लग्नसोहळा पार पडला आहे. यांच्या लग्नाला अनेक कलाकार उपस्थित होते.

या दोघांचा 24 डिसेंबरला साखरपुडा पार पडला होता.

Hruta Durgule Prateek Shah Wedding

लग्नामध्ये हृताने पिवळ्या रंगाची आणि लाल काठ असलेली कांचीपुरम साडी परिधान केली होती. तसेच प्रतीकने व्हाईट शेरवानी परिधान केली होती.

ह्रता आणि प्रतीकचा लग्नसोहळा काल मुंबईत अत्यंत खाजगी पद्धतीने पार पडला आहे.

Hruta Durgule Prateek Shah Wedding

हृता आणि प्रतीकने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नामधील काही खास क्षणाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना चाहत्यांनी चांगलीच पसंती दिली असून शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Hruta Durgule Prateek Shah Wedding

हृता आणि प्रतीकच्या लग्नाला 'दादा एक गुड न्यूज आहे' (Dada Ek Good News Aahe) या नाटकाचे सहकलाकार आणि निर्माती उमेश कामत (Umesh Kamat) आणि प्रिया बापट (Priya Bapat) उपस्थित होते.

Hruta Durgule Prateek Shah Wedding