अथिया शेट्टी आणि केएल राहुल अडकले विवाहबंधनात; पहिला फोटो समोर

Shweta Shigvan-Kavankar

अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल आज विवाहबंधनात अडकले आहेत.

सुनील शेट्टी यांच्या खंडाळ्याच्या बंगल्यात अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांनी सात फेरे घेतले.

या शाही लग्नाला बॉलिवूड आणि स्पोर्ट्स इंडस्ट्रीतील स्टार्स आणि कपलचे जवळचे मित्र उपस्थित होते.

केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या लग्नाचे पहिले फोटो समोर आले आहेत.

दोघेही सुंदर पेस्टल गुलाबी पोशाखांमध्ये मेड फॉर इच अदर दिसत आहेत.

दोघांचे लग्नाचे कपडे डिझायनर अनामिका खन्ना यांनी तयार केले आहेत.

अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांच्या लग्नाचे फोटो आता सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

दोघांवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

अथिया शेट्टी आणि केएल राहुलची प्रेमकहाणी एखाद्या परीकथेपेक्षा कमी नाही

दोघेही एका कॉमन फ्रेंडद्वारे भेटले होते. नंतर हळूहळू त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.