Commonwealth Games 2022 Opening Ceremony: राष्ट्रकुल स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा; पाहा फोटो

Siddhi Naringrekar

राष्ट्रकुल स्पर्धेचा शुभारंभ इंग्लंडमधील बर्मिंगहॅम शहरात अलेक्झांडर स्टेडियमवर ११ दिवस चालणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या उद्घाटन सोहळ्यात भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रित सिंग यांनी भारतीय गटाचे नेतृत्व केलं. PV सिंधू कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारतीय दलाची ध्वजवाहक बनली. ही स्पर्धा २८ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीमध्ये ही पार पडणार आहे.

बर्मिंगहॅममध्ये एका रंगारंग कार्यक्रमानं राष्ट्रकुल स्पर्धेला सुरुवात झाली. 30 हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत भव्य उद्घाटन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यात बर्मिंगहॅम देशाचा गौरवशाली इतिहास दाखवण्यात आला.

नोबेल पारितोषिक विजेती मलाला युसफाई हिनं सर्व खेळाडूंचं खेळात स्वागत केलं. मलालानं शिक्षण आणि शांतीचा संदेश दिला. मलाला तिच्या शस्त्रक्रियेपासून बर्मिंगहॅममध्ये स्थायिक झाली आहे आणि तिला तिचं घर मानते.

बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारतीय दलाची ध्वजवाहक बनल्याबद्दल पीव्ही सिंधूने आनंद व्यक्त केला आहे. सिंधू म्हणाली, ''2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय दलाचा ध्वजवाहक होणे ही अभिमानाची गोष्ट आहे. मी याबद्दल खूप आनंदी आहे आणि माझ्या सहकारी खेळाडूंना शुभेच्छा देऊ इच्छिते. याशिवाय मला भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे आभार मानायचे आहेत, ज्यांनी मला ही संधी दिली.''

उद्घाटन समारंभात 10 मीटर लांबीचा बैल उभा करण्यात आला. त्याच्या मदतीनं बर्मिंगहॅमने आपला अनेक वर्षांचा संघर्ष दाखवला गेला. या शहरानं सर्व अडचणींवर कशी मात केली हे देखील दाखवून दिलं.

गेल्या २० वर्षांत इंग्लंडमध्ये तिसऱ्यांदा या खेळांचे आयोजन होत आहे. १९३० मध्ये सुरू झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची ही २२वी आवृत्ती आहे.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२२ ही २०१२ च्या लंडन ऑलिंपिकनंतर ब्रिटनमधील सर्वात महागडी स्पर्धा असल्याचे म्हटले जात आहे.