जान्हवी कपूर साऊथमध्ये करणार डेब्यू, फर्स्ट लूक केला शेअर

Shweta Shigvan-Kavankar

अभिनेत्री जान्हवी कपूरचा आज 26 वा वाढदिवस साजरा करत आहे.

2018 मध्ये तिने धडक चित्रपटातून पदार्पण केले. त्यानंतर ती गुंजन सक्सेना, रुही, मिली, गुडलक जेरी या चित्रपटात दिसली.

आता जान्हवी साऊथमध्ये डेब्यू करण्यास सज्ज झाली आहे.

स्वत: जान्हवी कपूरने वाढदिवसानिमित्त नवीन प्रोजेक्टची घोषणा करून चाहत्यांना मोठी भेट दिली आहे.

ती NTR 30 मध्ये झळकणार असून ज्युनियर NTR सोबत स्क्रिन शेअर करणार आहे.

जान्हवी कपूरने इन्स्टाग्रामवर चित्रपटातील पहिला लूक शेअर केला आहे.

यामध्ये जान्हवीने लेहेंगा चोली परिधान केला असून एका खडकावर बसली आहे.

या पोस्टवर केवळ चाहतेच नाही तर सेलिब्रिटींनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आगमी काळात जान्हवीचे बावल, तख्त, मिस्टर अँड मिसेस माही प्रदर्शित होणार आहे.