अनिल अंबानींची ‘ही’ कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर; ३८ बँकांचा जीव टांगणीला

अनिल अंबानींची ‘ही’ कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर; ३८ बँकांचा जीव टांगणीला

Published by :
Published on

अनिल अंबानी यांची रिलायन्स कम्युनिकेशन दिवाळखोरीत गेल्यास याची मोठी किंमत ३८ बँकांना मोजावी लागणार आहे. रिलायन्स कम्युनिकेशनला ४० हजार कोटीचे कर्ज दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून उद्योजक अनिल अंबानी यांचा पाय अधिकाधिक खोलात जात असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच आर्थिक संकटात सापडल्यामुळे अनिल अंबानी त्यांच्यापुढे दररोज नवनवीन समस्या उभ्या राहत आहेत.अनिल अंबानी यांची एकेकाळी दूरसंचार सेवेतील आघाडीची कंपनी असलेली रिलायन्स कम्युनिकेशन दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. रिलायन्स कम्युनिकेशन दिवाळखोरीत गेली, तर किमान ४० हजार कोटींच्या कर्जावर पाणी सोडावे लागेल या भीतीने सध्या बँकांचा जीव टांगणीला लागला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com