अनिल गोटे
अनिल गोटे

माजी आमदार अनिल गोटेंनी घेतली पोलिस आयूक्त पांडेंची भेट… ‘हे’ आहे कारण

Published by :
Vikrant Shinde
Published on

मागील काही दिवस विधानसभेच्या अधिवेशनात 'पेन ड्राईव्ह बाँब' हा मुद्दा सर्वात जास्त गाजलेला पाहायला मिळतोय. ह्या पेन ड्राईव्ह बाँबच्या मुद्द्यावरून आज राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिल गोटे ह्यांनी आज मुंबईचे नवनिर्वाचित पोलिस आयूक्त संजय पांडे यांची भेट घेतली.

नेमकं प्रकरण काय?
'देवेंद्र फडणवीसांनी सभागृहासमोर सादर केलेल्या पेन ड्राईव्हमधील पुराव्यांशी छेडछाड करण्यात आली असून, प्रवीण चव्हाण यांना मी कधीही भेटलेलो नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी' ही मागणी करण्यासाठी आज अनिल गोटे ह्यांनी संजय पांडे यांची भेट घेतली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com