“लस घेताच तुम्ही बाहुबली बनता” पंतप्रधानांच्या वक्तव्यावर नेटकऱ्यांनी पाडला मीम्सचा पाऊस!

“लस घेताच तुम्ही बाहुबली बनता” पंतप्रधानांच्या वक्तव्यावर नेटकऱ्यांनी पाडला मीम्सचा पाऊस!

Published on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी लस घेताच आपण करोनाविरोधातल्या लढाईत 'बाहु'बली बनतो, असं वक्तव्य केलं.

नेटकऱ्यांनी या बाहुबलीचा संदर्भ बाहुबली चित्रपटाशी जोडला आहे.

पंतप्रधान म्हणाले होते, लस ही हातावर(बाहू) देण्यात येते आणि जेव्हा लस हातावर देण्यात येते तेव्हा तुम्ही बाहुबली बनता.

करोनाविरुद्धच्या लढाईत जर तुम्हाला बाहुबली बनायचे असेल तर तुम्हाला हातावर लस घ्यावी लागेल. आता पर्यंत ४० कोटी पेक्षा जास्त लोकं करोनाविरुद्धच्या लढाईत बाहुबली बनले आहेत, असंही पंतप्रधान म्हणाले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com