Lakhimpur Violence | आरोपी आशिष मिश्राला तीन दिवसांची कोठडी

Lakhimpur Violence | आरोपी आशिष मिश्राला तीन दिवसांची कोठडी

Published by :
Published on

उत्तरप्रदेशातल्या लखीमपूर खेरी हिंसाचाराच्या प्रकरणातील मुख्य आरोपी आशिष मिश्रा याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. लखीमपूरच्या सीजेएम न्यायालयाने हा निकाल दिला. तसेच या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेलं विशेष तपास पथक आता सखोल चौकशी करणार आहे.

एसआयटीने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आशिष मिश्राला न्यायालयासमोर सादर केले होते. यावेळी न्यायालयात पोलिसांनी १४ दिवसांच्या पोलीस कोठडीच्या मागणीसाठी अर्ज दिला होता. पोलिसांनी कोर्टात सांगितलं की, आशिष मिश्राची फक्त १२ तास चौकशी होऊ शकली, ज्यात त्याने उत्तरं दिली नाहीत. म्हणून त्याला १४ दिवसांच्या कोठडीत ठेवणे आवश्यक आहे. मात्र आता कोर्टाने १४ दिवसांऐवजी तीनच दिवसांची कोठडी सुनावली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com