West Bengal Assembly Elections 2021; माजी क्रिकेटर आणि भाजप उमेदवार अशोक डिंडावर जीवघेणा हल्ला

West Bengal Assembly Elections 2021; माजी क्रिकेटर आणि भाजप उमेदवार अशोक डिंडावर जीवघेणा हल्ला

Published by :
Published on

राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून हिंसाचाराच्या घटना वाढत चालल्या आहेत. आज माजी क्रिकेटर आणि मोयना विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार अशोक डिंडावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. निवडणूक आयोगाकडे या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश जिल्हा प्रशासला दिले आहेत.

भाजपचे उमेदवार अशोक डिंडा सायंकाळी ४.३० वाजल्याच्या सुमारास एका रोड शोहून परतत असताना मोयना बाजारासमोर त्यांच्यावर शेकडो अज्ञातांनी लाठ्या काठ्या, लोखंड्या सळ्या आणि दगडांनी त्यांच्यावर गाडीवर हल्ला केला. या हल्ल्यात डिंडा यांच्या खांद्याला दुखापत झालीय. तसंच डिंडा यांच्या गाडीचंही नुकसान झाली असल्याची माहिती डिंडा यांच्या व्यवस्थापकाने दिली आहे.

तृणमूल काँग्रेसने केला हल्ला

दरम्यान तृणमूल काँग्रसनं हल्ला घडवून आणल्याचा दावा डिंडा यांनी सोशल मीडियावर केला आहे.तृणमूल काँग्रेसकडून मात्र भाजपचे सगळे आरोप फेटाळून लावण्यात आले आहेत. 'डिंडा यांच्यावरील हल्ला हा भाजपच्या अंतर्गत वादाचा परिणाम असल्याचे सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com