कर्नाटकात भाजपाला घरचा आहेर… पक्षातील नेत्याचा २१ हजार कोटींचा आरोप

कर्नाटकात भाजपाला घरचा आहेर… पक्षातील नेत्याचा २१ हजार कोटींचा आरोप

Published by :
Published on

कर्नाटक भाजपातील कलह दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. यामध्ये मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांना हटवण्याची मागणी जोर धरत आहे. मात्र अद्याप येडियुरप्पांना हटवण्याचा कोणाही निर्णय हायकमांडने घेतला नसल्याने पक्षातील अंतर्गत कलह वाढत आहे.

एक अथवा दोन लोक मीडियात बोलत आहेत. ते वाढवून दाखवलं जातं. ते लोक सुरुवातीपासूनच असे करत आहेत. एवढेच नाही, तर पक्षाचे राष्ट्रीय प्रभारी अरूण सिंह यांनीही त्यांना भेट दिली नाही. अशात कसल्याही प्रकारचे कन्फ्यूजन नाही. कॅबिनेटमधील कुणीही सदस्य दुःखी नाही, असे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी म्हटले आहे.

21,473 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप

भारतीय जनता पक्षाचे नाराज विधानपरिषद सदस्य ए. एच. विश्वनाथ यांनी शुक्रवारी, पाटबंधारे विभागाने 21,473 कोटी रुपयांची निविदा कुठल्याही प्रकारची वित्तय मंजुरी न घेताच घाई घाईने तयार केली आणि यात घोटाळा झाला असल्याचे म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com