Bacchu Kadu
Bacchu Kadu

Bacchu Kadu : आमच्या शिवाय राज्यात सरकार बसणार नाही

बच्चू कडूंचा सरकार स्थापनेबाबत मोठा दावा
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • आमच्या शिवाय राज्यात सरकार बसणार नाही

  • बच्चू कडूंचा सरकार स्थापनेबाबत मोठा दावा

  • परिवर्तन महाशक्तीचे 15 ते 20 उमेदवार विजयी होतील

काल विधानसभा निवडणुकासाठी मतदान पार पडलं. आता 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू म्हणाले की, मतदानाचा खेळ संपला आता कागदाचा खेळ सुरु झालेला आहे. मला मतदारांवर विश्वास आहे.

ही निवडणूक आम्ही सहज जिंकणार आहोत. राज्यात आमच्या शिवाय सरकार स्थापन होणार नाही. आम्ही लहान पक्ष आणि अपक्ष ठरवणार आहे कोणाला पाठिंबा द्यायचा.

यासोबतच ते म्हणाले की, परिवर्तन महाशक्तीचे 15ते 20 आमदार विजयी होतील. आम्ही कोणाला पाठींबा देणार नाही तर आम्ही ठरवू कोणाचा पाठींबा घ्यायचा. आमचे सरकार स्थापन करण्यासाठी. असे बच्चू कडू म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com