Best Bus Protest Update: बेस्टच्या कर्मचाऱ्यांना मिळणार दिवाळी बोनस

दरवर्षी दिवाळीच्या आदल्या दिवशी येणारा बेस्ट कर्मचाऱ्यांचा बोनस यावेळी बेस्ट कर्मचाऱ्यांना मिळाला नव्हता.

दरवर्षी दिवाळीच्या आदल्या दिवशी येणारा बेस्ट कर्मचाऱ्यांचा बोनस यावेळी बेस्ट कर्मचाऱ्यांना मिळाला नव्हता. त्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी आज भाऊबिजेच्या दिवशी संपाचा इशारा दिला होता. LOKशाहीच्या पाठपुराव्याला यश मिळाताना दिसत आहे. बेस्टच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस मिळणार आहे.

2 ते 3 दिवसांमध्ये बेस्टच्या कर्मचाऱ्यांना हा दिवाळीचा बोनस दिला जाणार आहे. या बोनससाठी पालिकेकडून 80 कोटींचा निधी देण्यात आला आहे. सुहास सामंत यांच्या पुढाकारामुळे या मागणीला यश येताना दिसत आहे. ही बातमी सतत लोकशाही मराठीने लावून ठेवली होती आणि त्याचाच हा प्रभाव पडल्याचं दिसून येत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com