Vidhansabha Election
Bhaskar Jadhav on Shivsena UBT Candidate List: भास्कर जाधवांना उमेदवारी जाहीर, काय म्हणाले जाधव
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची यादी ही जाहीर झालेली आहे. त्यात भास्कर जाधव यांना गुहागर येथील उमेदवारी मिळालेली आहे. याचपार्श्वभूमीवर भास्कर जाधव प्रतिक्रिया देत म्हणाले की,
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची यादी ही जाहीर झालेली आहे. त्यात भास्कर जाधव यांना गुहागर येथील उमेदवारी मिळालेली आहे. याचपार्श्वभूमीवर भास्कर जाधव प्रतिक्रिया देत म्हणाले की, या वेळेस धुरळा उडेल की नाही हे निश्चित नाही कारण विरोधी उमेदवार कोण असणार आहे हे अद्याप माहित नाही.
सुरुवातीच्या काळामध्ये भाजपने खुप मोठा प्रयत्न केला आणि त्यांनी अंदाज घेतला की, आपली काही डाळ शिजण्यातली नाही आहे. ते माघारी गेले, त्यानंतर ही खुप मोठा बलाढ्य धनवान अशा प्रकारचा उमेदवार समोर आला त्याने देखील मागे फिरुन पाहिल आपण याठिकाणी निवडणूक लढवण्यात काही फायदा नाही. त्यामुळे आता तिसरा उमेदवार कोण आहे, एक नाव समोर आलं आहे पण अधिकृतपणे ते नाव माझ्या समोर आलेलं नाही, तर महायुतीचा उमेदवार अजून जाहिर झालेला नाही.