Aaditya Thackeray Win Worli Election Result 2024 : ठाकरेंनी वरळीचा गड राखला; आदित्य ठाकरे विजयी
मुंबईतील वरळी मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांनी विजय मिळवला आहे. आदित्य ठाकरे 57553 मतांनी विजयी झाले आहेत. मुंबईतील वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे विरुद्ध मनसेचे संदिप देशपांडे विरुद्ध एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद देवरा हे तीन प्रमुख लढत होती.
उमेदवाराचे नाव : आदित्य ठाकरे
मतदारसंघ : वरळी
पक्षाचे नाव - ठाकरे शिवसेना
समोर कोणाचं आव्हान - मिलिंद देवरा, संदीप देशपांडे
आदित्य ठाकरे हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व पक्षाचे आमदार आहेत. त्यांचा जन्म १३ जून १९९० रोजी मुंबईत झाला. ठाकरे यांनी मुंबईतील सेंट झेव्हियर्स कॉलेजमधून बी.ए. आणि केसी कॉलेजमधून एलएल.बी. पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. आदित्य हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र तथा शिवसेनाप्रमुख, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत.
राजकीय कारकीर्द:
आदित्य ठाकरे यांनी वयाच्या 20 व्या वर्षी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात शिवसेना पक्षातून केली. युवा सेनेच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात उडी घेतली होती.
सन 2010 पासून ते युवा सेनेचे प्रमुख म्हणून कार्यरत
2018 पासून ते शिवसेनेचे नेते म्हणून कार्यरत
2019 च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांची पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर आमदार म्हणून निवड
मुंबईतील वरळी या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व
जानेवारी 2020 ते जून 2022 पर्यंत त्यांना राज्याचे पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार खात्याचे मंत्री म्हणून काम