Bipin Rawat : लष्कर विमान दुर्घटनेमुळे राजभवन दरबार हॉलच्या उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द

Bipin Rawat : लष्कर विमान दुर्घटनेमुळे राजभवन दरबार हॉलच्या उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द

Published by :
Published on

तामिळनाडूतील कुन्नूर येथे लष्कराचे MI17V5 विमान कोसळले. भारतीय वायुसेनेच्या या हेलिकॉप्टरध्ये देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीसह १४ लष्करी अधिकारी उपस्थित होते. या अपघातात मृतांचा आकडा 11 वर गेला आहे. तर सीडीएस रावत गंभीर जखमी आहेत. दरम्यान या घटनेनंतर राजभवन दरबार हॉलच्या उद्घाटनचा कार्यक्रम रद्द करण्यात आलेला आहे.

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते आज संध्याकाळी ४ वाजता राज भवन मुंबई येथील नवीन बांधण्यात आलेल्या दरबार हॉल चे उदघाटन करण्यात येणार होते. या कार्यक्रमाला भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद , महाराष्ट्राचे राज्यपाल, भगत सिंह कोश्यारी त्याच बरोबर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार ,तसेच मुंबईचा महापौर किशोरी पेंडेकर हे सर्व उपस्थित राहणार होते.मात्र बिपिन रावत आणि १४ लष्करी अधिकारी यांच्या लष्करी विमानाला झालेल्या दुर्घटनेमुळे राजभवन दरबार हॉलच्या उद्घाटनचा कार्यक्रम रद्द करण्यात आलेला आहे. लष्करी विमान कोसळल्यामुळे त्या विमानात झालेल्या मृत्यूमुळे हे कार्यक्रम स्थगित करण्यात आल्याचं सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com