माणसातही बर्ड फ्लूची लागण, कुठे आढळला पहिला रुग्ण?
कोरोना पाठोपाठ आता बर्डफ्लूने देखील राज्यात हाहाकार माजवला आहे. बर्डफ्लू हा आजार पक्षांना होत आहे. मात्र आता धक्कादायक म्हणजे हा आजार आता माणसांमध्येही होत असल्याचं समोर आलंय. रशियात माणसाला बर्ड फ्लूची बाधा झाल्याची नोंद झालीय. हा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर रशियाने याबाबत जागतिक आरोग्य संघटनेला याबाबत माहिती देत सांगितले आहे .
त्यामुळे कोरोनानंतर जगावर बर्ड फ्लूचं संकट ओढावणार का अशी शंका निर्माण होत आहे. दक्षिण रशियातील काही पोल्ट्री वर्करमध्ये हा स्ट्रेन असल्याचा संशय होता. त्यामुळे संशोधकांनी अशा 7 कामगारांना वेगळं केलं होतं. असं असलं तरी संबंधित कामगारांची प्रकृती स्थिर आहे.
रशियातील संशोधकांना एका माणसात बर्ड फ्लूचा एक स्ट्रेन आढळला आहे. या संसर्गाचा धोका ओळखून जगाने याला तोंड देण्यास तयार राहावं, असं मत रशियातील संशोधकांनी व्यक्त केलंय. माणसांचा बर्ड फ्लू झालेल्या पक्षांशी जवळून संबंध आल्यावर बर्ड फ्लूचा संसर्ग होत आहे असे जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार समजते.