पुण्यात भाजपच्या किरीट सोमय्यांना शिवसैनिकांकडून धक्काबूक्की; वाचा सविस्तर
कोविड सेंटरच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत यासंदर्भातील चर्चेसाठी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे आज पुणे महापालिकेत (Pune Municipal office) आले होते.
पुणे महानगरपालिकेत आलेल्या भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना शिवसेनेच्या (Shivsena) कार्यकर्त्यांकडुन धक्काबुक्की करण्यात आली. या झटापटीत सोमय्या हे पायऱ्यांवर कोसळले. आक्रमक झालेल्या शिवसैनिकांना पाहून किरीट सोमय्या यांनी आपला पुण्यातील कार्यक्रम रद्द करत महापालिकेतून काढता पाय घेतला.
यावेळी शिवसैनिकांनी प्रचंड गोंधळ घातला. झटापटीत किरीट सोमय्या चक्क पायऱ्यांवर कोसळले. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची आक्रमक भूमिका पाहून सोमय्या यांच्या सुरक्षारक्षकांनी त्यांना गाडीत बसवत गाडी पुढे नेली. यावेळी गाडीलाही गराडा घातला गेला होता.
या घटनेनंतर पुण्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून भाजप (BJP) आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.